

मुंबई (प्रतिनिधी) सह्याद्री अतिथी गृहात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली भीमकोरेगाव प्रकरणाची सविस्तर चर्चा केली 1 जानेवारी 2017 च्या दंगलीच्या मागे संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे ह्यांचा हात होता त्यामुळे त्यांना अटक करावी असे सांगितले संपूर्ण राज्यांतून येणाऱ्या आंबेडकरी जनतेच्या सुरक्षाची काळजी घ्यावी भीमा कोरेगाव परिसरात महिला व पुरुष यांची शौचालयाची वेगळी बांधण्यात यावी. ज्या ज्या रस्त्याने बौद्ध बांधव येथील त्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त सक्षम द्यावा. संभाजी भिडे यांनी पुणे येथील पत्रकारपरिषेदेत महिला विषयी असभ्य उद्गार काढले याचा आमदार प्रकाश गजभिये यांनी निषेध केला व महिलांचा अवमान केला म्हणून त्यांच्यावर कारवाई करवून त्यांना अटक करावी संपूर्ण पुणे जिल्ह्यात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटेच्या कार्यकर्त्यांना मजाओ करण्यात येणार व पोलिसांची संख्येत वाढ करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना केली .यावेळी मुख्यमंत्री यांनी कुठल्याही प्रकारे संभाजी भिडे यांची गैर केली जाणार नाही. तसेच शॉर्य विजयस्तंभ सोहळा दिमाखाने साजरा होईल कुणी विरोधकांनी त्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची जागा दाखवून देऊ असे स्पष्ट आश्वासन माननीय उद्धव ठाकरे यांनी दिले.यावेळी विधान परिषेद सदस्य आमदार अनिल परब आमदार सुरेश प्रभू , अनिल बोराडे सतीश गायकवाड, राजु मोरे, अमोल हिरे, तन्मय गावडे,मोहमद असिफ भाई, अफजल भाई उपस्थित होते.