
अल्पसंख्यांक ख्रिश्चन विकास महासंघ प्रणित ख्रिस्ती सेना चे मा.सुनिलजी आवळे यांची मागणी.
वसई : ( अतुल साळवी) मनोरंजनाच्या नावाखाली काहिही खपवून आपल्या टिआरपी त वाढविण्यासाठी कोणत्याही थराला जाणार्या टिव्ही वाहिन्यांवर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे.
या टिआरपीच्या नादात लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात याची साधी खंत देखील या टिव्ही चेनल्सना देखील राहिली नाही.
फराह खान यांच्या बेक बेंचर्स या कार्यक्रमात ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
बेक बेंचर्स या कार्यक्रमात फराह खान, भारती सिंग आणि रविना टंडन यांनी बायबल मधील पवित्र शब्द हालेलुया चा अयोग्य वापर करून अत्यंत खालच्या थराची टिप्पणी करून समस्त ख्रिस्ती बांधवांच्या भावना पवित्र नाताळ सणात दुखविल्या आहेत.
सदर प्रकारा बाबत अल्पसंख्यांक ख्रिश्चन विकास महासंघ प्रणित ख्रिस्ती सेना या संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा.सुनिलजी आवळे व महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.गौतम खंडागळे ख्रिस्ती सेने मार्फत या तिघींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदना मार्फत नालासोपारा पुर्व येथील तुलिंज पोलीस स्थानक व नालासोपारा पोलीस स्टेशन पश्चिम या दोन्ही पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.
