

प्रतिनिधी : (संतोष पाल) मराठी साहित्य शाखा व मराठी मंदिर यांच्या सहयोगाने राष्ट्रीय शिक्षक संचेतना द्वारा सर्व भाषीय साहित्य सम्मेलन दिनांक २४ व २५ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने देशातील व राज्यातील अनेक रचनाकारांनी आपली उपस्थिती दर्शविली. प्रदेशाध्यक्ष डॉ.सुशीला पाल यांच्या संचलनात दि.२४ डिसेंबर ला झालेल्या कवी संमेलनात हिंदी आणि मराठी भाषांचे जाणे माने कवींनी सहभाग दर्शविला. कार्यक्रमाची सुरुवात श्री कलादृष्टी ओसन अँड आर्ट्स अकादमी ठाणे येथील मुलींनी सरस्वती वंदना प्रस्तुत करून कार्यक्रमाची सुरुवात केली. ततपश्र्चात आयोजनात झालेल्या कविनी आपली रचना प्रस्तुत केली. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध कवित्री डॉ. संगीता पाल यांनी केलेल्या रचना कवितांनी लोकांचे मन आकर्षित केले. डॉ. संगीता पाल या प्रसिद्धी कवित्री आहेत संगीता पाल यांचे आत्तापर्यंत त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यामध्ये बिकरे अनुभव व जीवन के रंग नामक कविता संग्रह सुद्धा सदर कार्यक्रमात प्रकाशित केले. तथा डॉ. संगीता पाल यांना अटल श्री काव्य सन्मानाने सन्मानित करण्यात आले. डॉ. संगीता पाल यांना देशातील अनेक राज्यातून साहित्यिक संस्थांनी सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. संगीता पाल यांची लेखणी व कविता या नागरिकांना खूपच आवडत आहेत सर्व ठिकाणी त्यांची व्हावा होत आहे सदर कवितांची पुस्तके ॲमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहेत.