केळवे.दि. २८/१२/२०१९ *डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था* व *आदर्श विद्यामंदिर केळवे* यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी स्वसंरक्षण एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर आदर्श विद्यामंदिर केळवे येथे पार पडले. ह्या शिबीरात परिसरातील विद्यार्थीनी आणि महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. शिबीराचे प्रमूख मार्गदर्शन *श्री. लक्ष्मीकांत सारंग* (विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेते तज्ञ व गुन्हे अन्वेषण विशेष विभाग, मुंबई पोलीस, कमांडो पथक) ह्यांनी केले. प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करताना त्यांच्या स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थीं च्या बरोबर राहून त्यांना मदत केली. छेडछाडी पासून स्वसंरक्षण आणि प्रत्यक्ष बलात्काराचा प्रयत्न होताना करावयाचे स्वसंरक्षण अशा दोन्ही प्रकारांच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षणार्थींकडून ते करवून घेतले.
ह्या प्रसंगी *सौ. सिद्धवा जायभाये* स.पो.नि. गुन्हे अन्वेषण विभाग पालघर ह्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले व विद्यार्थीनींनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखूलास उत्तरे दिली. असे शिबीर आयोजीत करण्याचा पहिलाच प्रयत्न असून सुद्धा शिबीराला मिळालेला प्रतिसाद लक्षणीय होता. शिबीरात शिकवण्यात आलेले तंत्र आणि माहिती अतिशय उपयुक्त असल्याची भावना अनेक महिलांनी आणि विद्यार्थीनींनी व्यक्त केली तसेच शिबीराचे आयोजन अगदी उत्कृष्ट रित्या झाल्याचे सांगितले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आणि युवक मित्र मंडळ केळवे च्या महिलांनी स्वयंसेवकांची भुमिका बजावली. तसेच अल्पोपाहाराची व्यवस्था हाँटेल निमा ह्यांच्याकडून विनामुल्य करण्यात आली होती. ह्या शिबीराची रुपरेशा आणि संकल्पना डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेचे सभासद श्री अमेय सावे ह्यांची होती तर तिला मुर्त स्वरुप देण्यात आदर्श विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नुतन विद्या विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी,सागरी पोलीस स्टेशन केळवे, ग्रामपंचायत केळवे ह्यांचा सिंहाचा वाटा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *