
प्रतिनिधी : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे ब्रीद वाक्य वापरून आगाशी रिक्षा चालक-मालक ब्लड ग्रुप यांनी रविवारी दिनांक 2९ डिसेंबर २०१९ रोजी टेंभी- कोल्हापूर ग्रामपंचायत सभागृह आगाशी विरार (पश्चिम) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात आगाशी विभागातील रिक्षाचालकांनी व इतर नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. आजची स्थिती पाहता रक्ताची गरज ही सर्व नागरिकांना भासते या उद्देशाने आगाशी रिक्षा चालक-मालक मंडळांनी पुढाकार घेऊन सदर शिबिर व्यवस्थितरित्या पार पाडले. मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर वागळे यांनी प्रतिनिधी ला माहिती दिली की सदर शिबिरात ४० ते ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांनी हे सुद्धा सांगितले की पूजा आम्ही रक्तदान शिबिरे वर्षातून दोन ते तीन वेळा ठेवत असतो आमचा एकच उद्देश आहे की गोरगरीब लोकांना याचा फायदा झाला पाहिजे आणि आम्ही रक्तदान शिबिर ठेवतो त्याचा फायदा खरोखर लोकांना होत असतो हे सर्व शक्य आहे ते माझ्या मंडळाच्या कार्यकत्याच्या मेहनतीने आम्ही असे शिबीर बहुतेक वेळा घेत असतो व लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. शिबिरात आगाशी विभागातील अनेक समाजसेवकांनी उपस्थिती दर्शविली. युवा विकास मंडळ आगाशी येथील कार्यकत्यांचे मोलाचे योगदान राहिले वरूण पुरदरे (युवा अध्यक्ष), स्वपनिल कळवि (ब.वि.आ.कार्यकर्ते), सौ.सुषमा लोपीस (नगरसेविका), सौ.रंजना थालेकर (नगरसेविका), राजू जाधव (अध्यक्ष-भिम नगर सत्पाळा) त्याच प्रमाणे आगाशी चालक मालक मित्र मंडळाच्या कार्यकत्यांनी अप्रतिम आयोजन केले होते त्यामध्ये प्रभाकर वागळे (अध्यक्ष), सुनिल तांडेल (उपाध्यक्ष), दिलीप पाटील (माजी अध्यक्ष), राकेश सामोरे (पिलो)-सचिव, योगेश मांगेला (विभाग प्रमुख), मिलींद गोसावी (खजिनदार), राजेश निजाई (उपखजिनदार), राजू राऊत (सेक्रेटरी), दिपक गायकवाड (उपसेक्रेटरी), परेश साळके (सल्लागार), समीर शेख (सल्लागार) यांनी सर्वानी शिबीराचे उत्कृष्ट आयोजन केले होते.