

नालासोपारा (प्रतिनिधी) :- उद्यावर येऊन ठेपलेल्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वसई तालुक्याच्या हद्दीमधील सातही पोलीस ठाण्याचे पोलीस सज्ज झाले आहेत. अपघात होवू नये, दारू पिऊन गाडी चालवू नये, ड्रग्स पिणाऱ्याना पकडण्यासाठी, रेव्ह पार्टी होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पथक तयार करण्यात आले आहेत. या नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.
सर्वत्र नवीन वर्षांचे सेलिब्रेशन होते पण मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसई गावात ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात होते. सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट, चायनिस दुकाने, केक शॉप, बियर शॉप, वाईन्स शॉप यांना रंगोरगोटी करून उत्तम रोषणाई करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहेत. तालुक्यातील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट वाल्याना नोटीस काढून पाठविण्यात आल्या आहेत. त्यात दिलेल्या अटी व नियमांचे पालन न झाल्यास हॉटेल व रिसॉर्ट मालकावर फ़ोजदरी कारवाई करणार असल्याचे नमूद केलेले आहे.
घरी आणि इमारतींच्या गच्चीवर होणाऱ्या नववर्षाच्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. जर पार्टीमध्ये मद्य घेतले जाणार नसेल तर परवानगी घेण्याची गरज नाही. पण जर मद्य घेतले जाणार असल तर परवानगी घेणे आवश्यक आहे. याच बरोबर बार, धाबे, महामार्गावरील हॉटेलमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. अबकारी विभागाने ख्रिसमस आणि वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात पूर्वद्रूतगती मार्ग, मुंबई-अहमदाबाद आणि अन्य हॉटेल्सवर नियमितपणे तपासणी सुरू केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
1) नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार केलेली आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह च्या केसेस करण्यासाठी मुख्य नाक्यावर नाकाबंदी केली जाणार आहे. रेव्ह पार्टी होणार नाही याची खबरदारी घेतली असून ड्रग्स पिणाऱ्यावर सुद्धा नजर ठेवून आढळल्यास कडक कारवाई करणार. तालुक्याच्या हद्दीतील सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्टला नियम व अटींचे नोटीस पाठविण्यात आली आहे. जर आदेशाचे पालन न केल्यास किंवा दोषी आढळल्यास रिसॉर्ट व हॉटेल्स मालकांवर कायदेशीर कारवाई करणार – विजयकांत सागर ( अप्पर पोलीस अधिक्षिक, वसई)