
महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळा चे पालघर शिरगाव बिच येथील सौ. यमुनाबाई निजप हायस्कूल च्या प्रागणात ४८ वें अधिवेशन मोठया उत्साहात संपन्न झाले. कर्यक्रमची सुरुवात सुमधुर संगीताच्या मैफिलीने झाली तसेच यमुना निजप हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी व कोळी नृत्य सादर करून झाली.आपल्या सर्व शिक्षकेतर बांधवांचा कळ्कळीचा प्रश्न १० – २० – ३० तसेच २४ वर्ष कालबध पदोन्नती करीता न्याय प्रविष्ठ प्रकरणे येत्या २ महीन्यात निकाली काढून त्याचा लाभ शिक्षकेत्तर बांधवांना मिळणार आहे तसेच १०-२०-३० याेजने चा लाभ मिळण्या बाबत शासन निर्णय येत्या २० दिवसात निर्गमित करण्यात येईल असे शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव मा. राजेंद्रजी पवार साहेबांनी मा. खासदार राजेंद्र जी गावित साहेब यांच्या उपस्थितीत दिले. मा. खासदार गावित यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रश्ना करीता मा. मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे यांच्याकडे चर्चे करीता महामंडळाचे पदाधिकारी यांच्या सोबत राहून प्रश्न सोडवीन्याचे आश्वासन दिले. तसेच बोईसर विधानसभा आमदार मा. श्री. राजेश जी पाटील यांनी देखील अधिवेशनात उपस्थित राहून शिक्षकेतर बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देऊन त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. या अधिववेशनसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्यातील शिक्षकेत्तर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य महामंडळ चे अध्यक्ष मा.श्री. वाल्मिकी सुरासे सरांनी केले. या कार्यक्रमात पालघर जिल्हा शिक्षक संघटना अध्यक्ष मा. श्री. पी.टी. पाटील सर, संघटना कार्यवाह मा.श्री. गणेश प्रधान सर, संस्था संघटना चे अध्यक्ष मा. श्री. वाघेश कदम सर उपस्थित राहून शिक्षकेतर बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रमात पालघर जिल्हा पतपेढी चे अध्यक्ष मा.श्री. संतोष पावडे सरांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची व्यथा मांडली. तसेच या कार्यक्रमाला पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य मा.श्री.घनश्याम मोरो, शिरगाव गावच्या प्रथम नागरिक मा. सौ. चिन्मयी मोरे तसेच शिरगाव शिक्षण संस्था चे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ उपस्थित होते.
सौ. यमुना निजप हायस्कूल च्या मुख्याध्यापिका मा.सौ. ठाकूर मॅडम व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.