

=======================
सत्तेचा सारीपाट
रोग भुकेचा होता ;
प्रश्न तर भाकरीचा होता .
उत्तर जाती-वादात शोधत होता ;
खेळ खुर्चीसाठीच होता .
प्रश्न महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाचा होता .
आमदारांचा भरला आज बाजार होता.
मंत्री बनला तो अमुकचा मुलगा होता .
तो उपमुख्यमंत्री तमुकचा भाचा होता .
इथे लोभ मंत्री पदाचा आहे .
हव्यास पाच वर्षाच्या सत्तेचा आहे .
तडीपार राज्य करत आहे .
पोशिंदा कर्ज माफीच्या आशेवर आहे .
नागरीकत्वासाठी नागरीक रस्त्यावर आहे .
परदेशी; भारताचा नागरीक बनतो आहे .
पावसाचे पाणिही आग लावत आहे .
मेक इन इंडीया म्हणारा देश विकत आहे .
जाणता राजा सारीपाट खेळत आहे .
वित्त/गृह खाते कोणाचे उत्सुक्ता आहे .
त्रिधा त्रिगुणीत करणारे हे सरकार आहे.
विरोधकांचा नाराजी सुर वाढतच आहे.