

नालासोपाऱा :- पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंह हे आपल्या सर्व उप-विभागीय अधिकाऱ्यांसह
नालासोपाऱा पोलीस ठाण्यात येत आहेत.
रायझिंग डे सप्ताह या उपक्रमाचा एक भाग म्हणून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस आणि नागरिक एकत्र आले तर बरेच प्रश्न सौम्य होतात.
बरीच जन जागृती होऊ शकते या विचाराने उद्याची म्हणजेच
२ जानेवारी रोजीची सं.४ वा.ची
पोलीस-पब्लिक जाहीर सभा
नालासोपाऱा पोलीस स्टेशनला होत आहे.
नालासोपाऱा पश्चिम विभागातील नागरिकांसाठीच
ही सभा असल्याने या सभेचे महत्त्व समजून सर्व आजी व माजी नगरसेवक, सर्व पक्षीय कार्यकर्ते, पीस व मोहल्ला समितीचे सदस्य, महिला दक्षता समिती, तट रक्षक दल, पोलीस पाटील, बहुभाषी पत्रकार यांनी
या सभेला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन नालासोपाऱा पोलीस स्टेशनचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी केले आहे.