

नालासोपाऱा ता. २(प्र.) सोपाऱ्यातील हसतमुख चेहरा लाभलेला उत्साही शिवसैनिक म्हणून दोन्ही पिढ्यात परिचितअसणारे निशिकांत क्षीरसागर उर्फ काका क्षीरसागर यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्का येऊन निधन झाले.पहाटे चारच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते साने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
परंतु उपचार सुरू होण्याआधीच त्यांनी दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला.केवळ साठ वर्षे वयाचे काका शिवसेनेचे माजी शहर उप प्रमुख होते. आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी प्रचंड आदर करणारे होते.त्यांच्या मागे आता पत्नी, एक विवाहित कन्या एक मुलगा असा परिवार आहे.क्षीरसागर हा मोठा परिवार सोपाऱ्यात चक्रेश्वर तलावाकाठी आहे.या परिवारासह सोपारा गाव आज या अचानक आलेल्या दुःखद् बातमीने हळहळले.सं.४ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघाली. समेळ पाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.
आज सकाळीच काका गेल्या ची वार्ता पसरली तशी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तलावाकाठी गर्दी झाली. बारामतीचे पई पाहुणे घरी आल्यावर अंत्ययात्रा निघली.
दरम्यान अनेक सेना नेत्यांनी, विविध पक्षांच्या ज्येष्ठ पदाधिकारी, काका मित्रपरिवारातील मान्यवर आज या अंत्ययात्रा आणि अंत्यविधीत सहभागी झाले होते.
अनेकांनी क्षीरसागर कुटुंबाला भेटून त्यांचे सांत्वन केले.