

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काते तर जिल्हा संपर्क प्रमुखपदी सुनिल सकट यांची नियुक्ती करण्यात आली. समितीचे प्र. अध्यक्ष साहेबराव पाचरणे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकित सदर पदाधिकार्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
पाचरणे यांच्या हस्ते काते व सकट यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी तात्या खंडागळे, विकास शिंदे, मार्कस खंडागळे, सुभाष सोनवणे, आजीनाथ काते, मनोज वडागळे, सुनिल उमाप, आकाश शिंदे, शरद खंडागळे, सविता वाघस्कर, मंगल मोरे आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील संगमवाडी येथे आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या समाधी स्थळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शासनाने धोरण ठरवून दिले असून, त्यानुसार काम होणार आहे. सदर काम महाराष्ट्र शासनाच्या स्मारक समितीच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली पार पडणार आहे. स्मारकाचे भूमीपूजन ते काम पुर्ण होईपर्यंन्त स्मारक समिती कार्यरत राहणार आहे. लहुजींच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हे स्मारक प्रेरणादायी ठरणार असून, हे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाजबांधव हजेरी लावणार असल्याची माहिती साहेबराव पाचरणे यांनी दिली. शासनाच्या आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समितीच्या ध्येय, धोरणानुसार दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची व समाजबांधवांच्या कल्याणासाठी कार्य करणार असल्याची भावना साहेबराव काते व सुनिल सकट यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.