

12 महिन्यांत 1 लाख 6 हजार 277 केसेस करून 4 करोड 20 लाख 42 हजार 400 रुपयांचा दंड केला वसूल
नालासोपारा (प्रतिनिधी) :- वसई तालुक्यात वाहूतुक पोलीसांनी 1 जानेवारी 2019 ते 31 जानेवारी 2019 या दरम्यान विविध ठिकाणी नाकाबंदी करून मद्यपी वाहन चालकांविरुद्ध तसेच मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमानव्ये वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने गेल्या 12 महिन्यांत 1 लाख 6 हजार 277 केसेस करून 4 करोड 20 लाख 42 हजार 400 रुपयांचा दंड केला वसूल करण्यात आला आहे. इतकी मोठी कारवाई झाल्याने मद्य पिऊन, बेशिस्त, भरधाव व बेदकारपणे वाहने चालवणाऱ्या चालकांमध्ये खळबळ माजली आहे.
जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 या 12 महिन्यांच्या कालावधीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सुपे, सहायक पोलिस निरीक्षक विनोद जाधव यांच्यासह 74 जणांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी नालासोपारा, वसई, विरार आणि नायगाव या शहरात कारवाई केली आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला कारवाई……
संपूर्ण पालघर जिल्ह्यात 31 डिसेंबरला मुख्य नाक्यावर वेगवेगळे पथक नेमून विशेष मोहीम राबवून मद्य प्राशन करून वाहन चालविनारे वाहन चालक तसेच बेदरकारपणे धूम स्टाईलने वाहन चालविणाऱ्या चालकांवर करडी नजर ठेवून विविध ठिकाणी नाकाबंदी करून एकूण 163 मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे आणि मोटार वाहन कायद्याचे विविध कलमानव्ये 596 केसेस करण्यात आल्या आहेत
अ. क्र. वर्गवारी केसेस तडजोड रक्कम
1) मद्य प्राशन करून वाहन चालविणे – 743 -12,60,000/-
2) परवाना उल्लंघन – 449 – 13,82,400/-
3) अवैध प्रवाशी वाहतूक – 87 – 1,23,100/-
4) वाहन चालवताना मोबाईल संभाषण – 3326 – 7,12,000/-
5) धोकादायकरित्या वाहन चालवणे – 924 – 9,47,800/-
6) सिग्नल जंपिंग – 7342 – 14,66,000/-
7) विरुद्ध दिशेने वाहन चालविणे – 4137 – 29,82,200/-
8) ट्रिपल सीट – 5497 – 10,72,400/-
9) नो पार्किंग – 31553 – 63,09,600/-
10) सीट बेल्ट – 1036 – 2,07,000/-
11) हेल्मेट – 1615 – 7,92,000/-
12) ब्लॅक काच – 210 – 41,800/-
13) इतर केसेस – 49358 – 2,47,46,100/-
———————————–
106277 4,20,42,400/-
1) यापुढेही मद्य पिऊन आणि बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची तीव्र मोहीम हाती घेण्यात येणार आहे. – विलास सुपे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलीस, वसई )