

आजाद मैदानावर 6 जानेवारी रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन ?
मुंबई : सि.ए.ए व एन.आर.सि विरोधात मोठ्या प्रमाणात देशभरात विरोध होत असताना, ‘बहुजन महापार्टी’ने या कायद्याला विरोध केला आहे. सोमवार, दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता महा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. असे पक्षाकडून परिपत्रक काढून कळविण्यात आले आहे.
बहुजन महापार्टीचे संस्थापक महासचिव शमशुद्दीन खान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महा आंदोलनास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन खान यांनी केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी, आमचा पक्ष हा गोरगरीब वंचीत कामगार यांचा आहे. आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा जमिनीशी जोडलेला असून आज या कायद्याच्या विरोधात त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. व तो व्यक्त करण्यासाठी आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा आदरकरून भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारातून आम्ही आमचे हे महाआंदोलन करणार आहोत. असे शमशुद्दीन खान म्हणाले.
बहुजन महापार्टीचे प्रवक्ते मन्सूर सरगुरोह यांनी परिपत्रक कडून ही माहिती दिली आहे.