

दु:खद बातमी ! सपोनि संदीप सानप यांचे ह्रदयविकाराने निधन नाशिक येथे होणार अंत्यसंस्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसंत सानप यांचे 4 जानेवारी 2020 रोजी वयाच्या 38 व्या वर्षी ह्रदयविकाराने निधन झाले. रेजिंग डे निमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट सामाना जिंकल्यानंतर अचानक सपोनि सानप यांच्या छातीत कळ आली अन् त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, ज्युनियर व सिनीयरला शिकणारी दोन मुले असा परिवार आहे. सपोनि सानप यांचे पार्थिव नाशिक येथील (ता. सिन्नर) चिंचोली या मूळगावी नेण्यात आले आहे. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रेजिंग डे निमित्त पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांतुमसार मैदानात क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. सकाळी 9:15 च्या सुमारास क्रिकेटच्या सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. केळवा व सफाळा पोलीस ठाण्यामध्ये क्रिकेटचा सामना झाला. प्रथम फलंदाजी करून केळवा पोलीस ठाण्याच्या संघाने 6 षटकात 58 धावा करून 59 धावांचे आवाहन सफाळा पोलीस ठाण्याच्या संघाला दिले. 59 धावांचे आवाहन पूर्ण करण्यासाठी सफाळे पोलीस ठाण्याच्या संघातर्फे प्रथम फलंदाजी करण्यासाठी सपोनि संदीप सानप मैदानात उतरले. उत्तमरीत्या फलंदाजी करून सपोनि सानप यांनी 4 षटकांमध्ये सामाना जिंकून दिला. दरम्यान, फलंदाजी करून मंडपात येऊन सपोनि संदीप सानप येऊन बसले. साधारण 10 मिनिटांनंतर सपोनि सानप यांना अस्वस्थ वाटू लागले. मळमळू लागू लागले. छातीत दुखू लागल्याने तात्काळ पार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून सपोनि सानप यांना पुडील उपचारासाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून वसई येथील प्लॅटिनम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच सपोनि सानप यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.