

वसई प्रतिनिधी (एस.रहमान शेख) गेल्या काही वर्षापासून वसई नालासोपारा विरार मध्ये चोरीचा प्रमाण खूप वाढलेला आहे, सतत चोरीचे प्रमाण वाढत असल्याने वसई विरार शहर चोरांचा माहेरघर झालेला आहे. काही ठिकाणी घरफोड्या होत आहेत अथवा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले जात आहे गाडी बाईक चोरीला जात आहेत लहान मुलांच्या वरती लैंगिक अत्याचार घडत आहे. गुन्हेगार मात्र सापडत नाही? गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश राहिलेला नाही असे वारंवार सातत्याने तक्रार करून देखील चोरीचं प्रमाण कमी होत नाही ! चोराच्या मनामध्ये पोलिसांविषयी भीती राहिलेली नाही ? चोरांच्या बाबतीत वसई तालुक्यातील पोलीस कुठे ना कुठेतरी कमी पडत आहेत ही भावना नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ? गुन्हेगारांवर पोलिसांचा वेळेवर आळा घातला आला असता तर आज रस्त्यावर नागरिकांना उतरण्याची वेळ आली नसती ! कुठे ना कुठे तरी चोरीचं प्रमाण कमी व्हावे आपल्याला एक सुखी जीवन जगता यावं म्हणून नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे शेवटी नाईलाजाने नागरिकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरून स्वतासाठी न्याय मागण्याची वेळ आली आहे. म्हणून शनिवार दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी दुपारी ठीक दोन वाजता सोपारा चक्रेश्वर तलावाजवळून धडक मोर्चा निघणार आहे सर्व ग्रामस्थांनी व नागरिकांनी काळाची गरज ओळखून हजारोच्या संख्येने मोर्चा शामिल व्हावे