
पालघर दि.5 : जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारी साठी दि 6 जानेवारी तसेच मतदान दि 7 जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यातील शाळा , विद्यालय तसेच महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम दि 17 डिसेंबर 2019 रोजी जाहीर केला असून त्या दिवसापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच 10 जानेवारी 2020 पर्यंत जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान 7 जानेवारी रोजी होणार आहे .या मतदान प्रक्रिये करिता नियुक्त करण्यात आलेले पथक 6 जानेवारी रोजी मतदान केंद्रावर रवाना होणार आहे मतदान प्रक्रियेत पालघर जिल्ह्यातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने तसेच जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्र हे शाळा , विध्यालय, तसेच महाविद्यालया मध्ये असल्याने तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी वरील दोन्ही दिवस जिल्ह्यातील शाळा, विध्यालय तसेच महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अधिसूचने द्वारे जाहीर केले आहे
