

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या अभ्यास दौऱ्याची सुरूवात अमृतसर येथील जालीयनवाला बाग व अटारी भारत पाक सीमा येथे वीरांना मानवंदना अर्पण करून करण्यात आली.
जालीयनवाला बागेतील ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने दांडेकर विधी महाविद्यालयाने अभ्यास दौऱ्या अंतर्गत एक विशेष मोहीम आयोजित केली होती. सदर मोहिमेदरम्यान
ऐतिहासिक घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. तद्नंतर विद्यार्थ्यांनी भारत – पाकिस्तान अटारी सीमेवर ध्वज संचलन कार्यक्रमात विशेष सहभाग नोंदवला.
भारतीय लष्कर व सीमा सुरक्षा दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी “झिरो लाईन आॅफ डिफेन्स” येथे विविध देशभक्ती गीतांवर आनंदोत्सव साजरा केला.
कायद्याच्या विद्यार्थांना संविधान तसेच विविध कायद्यांच्या ज्ञानासोबत भारताच्या ऐतिहासिक घटनांची प्रत्यक्ष अनुभूती घेणे आवश्यक आहे म्हणून सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातर्फे या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे असे प्राचार्य.डाॅ पायल चोलेरा यांनी सांगितले.
सदर अभ्यास दौरा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी खूप उपयुक्त ठरला अशी प्रतिक्रिया विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.