वसई : 6 जानेवारी म्हणजे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृती दिन व तो दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक व पहिले मराठी वृत्तपत्रकार व संपादक तसेच ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची ओळख होती. पत्रकारांसाठी यादिवसाचे खूप महत्त्व असल्याने भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाकडून या दिवसाचे औचित्य साधून वसईतील उपस्थित पत्रकार मित्रांचा सत्कार आज करण्यात आले.
यावेळी वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे, पत्रकार आनंद गदगी, लोकसत्ताचे पत्रकार सुहास बिऱ्हाडे, दै. वसई विकासचे कार्यकारी संपादक विजय खेतले, दै. चौफेर संघर्ष चे संपादक कैलास रांगणेकर, दै. वसई समता चे दत्ता पाटील , दै. आमची मुंबई चे विजय माने, दै. जागल्या योगेश लोयलेकर, युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादक रुबिना मुल्ला, उत्तर शक्ती चे नरेंद्र सोनी, मातृभूमी चे आशिष कदम, आपली वसई चे रतन नायक, पत्रकार चंद्रकांत भोईर, सुनील घरत, हरिश्चंद्र गायकवाड, बबलू गुप्ता, जयप्रकाश, मचिंद्र चव्हाण आदी पत्रकार उपस्थित होते.
भाजपा वसई रोड मंडळ अध्यक्ष उत्तम कुमार यांनी उपस्थितांना संबोधित करताना. पत्रकार हा समाजाला दिशा देत असतो. प्रशासनावर वचक ठेवण्याचे काम पत्रकार करतो असतो. व मला आनंद आहे की, वसई तालुक्याला आपल्या सर्वांच्या रूपाने अन्यायाला वाचा फोडणारे ही शस्त्रे मिळाली आहेत. व त्याला साजेसे असे काम आपल्याकडून चालू आहे. भविष्यातही आपल्याकडून निरंतर हे कार्य होत राहो यासाठी तुम्हाला शुभेच्छा व आभार!
या कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी व गोपाळ परब यांनी संबोधित केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन महेश सरवणकर यांनी केले. मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी विनोद कुमार, बाळा सावंत, मॅथ्यू कोलासो, रमेश पांडे, श्रीकुमारी मोहन, कांचन जहा, महेंद्र सिंग, एन जे इच्छापूरीया, लालजी कनोजिया, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *