
वसईमधून सात गुंड तडीपार

वसई : निवडणुकीच्या काळात पालघर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडून कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पालघर पोलिस अधिक्षकांनी कडक दक्षतेचा उपाय योजनेस सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत प्रांताधिकारी प्रशांत क्षीरसागर यांनी गुंडप्रवृत्तीच्या 7 गुडांना 1 वर्षासाठी तडीपार केले आहे तसेच 26 जणांना निवडणुकीच्या कार्यकाळात मनाई केली आहे. ही कारवाई 17 दिवस असणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. लोकसभा निवडणूकीत अनुचित प्रकार घडू नये समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वसई विरार शहरातील सात पोलीस ठाण्यानी तीन विभागीय पोलीस उपअधीक्षक त्यांच्यामार्फत वसईच्या प्रांतअधिकार्यांकडे तडीपारीसाठी 21 प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यामधील दोन्ही बाजूंची सुनावणी ऐकुन झाल्यावर प्रांताधिकारी प्रशांत क्षीरसागर सागर यांनी 7 जणांना 1 वर्षासाठी पालघर जिल्ह्यातून तडीपार केले आहे. एक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातून तडीपार झालेले हेच ते..
एक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातून तडीपार झालेले हेच ते..
तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील जावेद रफिक अन्सारी, मोन्टू ऊर्फ थापा चौधरी आणि प्रथमेश शिवराव पवार, वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मनोज गुलाब सिंग, पवन अभिमन्यू सिंग, नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील राजेश विजयशंकर यादव आणि माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील प्रिन्स उर्फ निलेश रमेश सिंग.
मतदान व मोजणी दिवशी 26 जणांना लावली जिल्ह्यात बंदी
सचिन अशोक थोरात,गौरव ऊर्फ विकास लालनाथ किणी, कौशिक नारायण गावड, शनी शंकर वाघरी ऊर्फ मल, बालाजी रामराव फड, उस्मान गफूर पटेल, महेश मधूकर कुडू, संजय बिहारी ऊर्फ संजय महंतो, अमित शाम पेंढारी, अजय लालमण पांडे, बद्रीआलम आकलाक चौधरी, अंकित ऊर्फ बंटी रामअवतार यादव, रवि पंढरीनाथ आगिवले, डूंगाराम सवाराम पटेल, रूपेश वालतीन डिमेलो, चंद्रकांत रवि लोखंडे, बाबर ऊर्फ बाबा शमशाद खान, इत्तेशाम मोहमंद रफीक अन्सारी, पवन सुनिल सिंग, ऋषीकुमार राजबली सिंग, वामन कृष्णा किणी, उदय अरूण जाधव, सलीम बाबुमिया सरदार, रशिद रौफ सय्यद, गोविंदा यल्लाप्पा गुजाळकर, संजय बिहारी ऊर्फ संजय महंतो.
पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावावर दोन्ही बाजूनी सुनावणी ऐकून झाल्यावर 7 जणांना 1 वर्षासाठी पालघर जिल्ह्यातून तडीपार केले आहे तर 26 जणांना निवडणुकीच्या मतदानाच्या व मोजणीच्या काळात मनाई आदेश लावला आहे. सोमवारी पालघर पोलिसांना प्रस्ताव पाठवून दिले आहे.-डॉ. दीपक क्षीरसागर(प्रांताधिकारी, वसई)