कर्मवीर स्नेहा जावळे यांचे वृृत्तकाव्य

राज ठाकरे-फडणविस यांच्यात
झाली बैठक गुप्त .
बैठकिने इतरांच्या डोक्यात उठले
विचारांचे थैमान सुप्त .
अजित पवार उत्तरले याच ठिकाणी
मी पण बैठक होती केली .
आज राज ठाकरेंची फडणविसांकडे
हजेरी कशाला लागली ?
फडणविस-राज ठाकरेंनी या बैठकीवर
भाष्य न करता मौन धरले .
जनतेला प्रश्न राज साहेबांचे पाऊल
भगवा सोडुन कमळाकडे का वळले ?
फडणविस भाऊ नविन सरकारला महिना
झाला तुम्ही पण मौन धरा .
मी पुन्हा येईल; मी पुन्हा येईल आता तरी
बोलण बंद करा .
भाजपला सावराया आर्टीकल ३७० पण
उपयोगी नाही आली .
निवडणुका उलटल्या तरी आर्टीकल १४४
वर्णी वारंवार लागली .
राज ठाकरे – फडणविस बैठकीची वाजंत्री
धुमधुमणार ?
ही बैठक केवळ चर्चेला उधाण आणणारी
धुवरड ठरणार ?

========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *