शिवसेना नवघर माणिकपूर शहर वसई तर्फे शुक्रवार दिनांक १० जानेवारी ते १२ जानेवारी या दरम्यान सकाळी ८.३० ते रात्री १० पर्यंत मिसळ महोस्तवाचे आयोजन पार्वती सिनेमा मैदान साईनगर , अंबाडी रोड, वसई पश्चिम येथे आयोजित केले असून आज दिनांक १० जानेवारी सकाळी ९.३० वाजता जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने संपादक श्री प्रसाद काथे यांच्या शुभहस्ते फीत कापून महोस्तवाचे उदघाटन केले त्यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख श्री शिरीष चव्हाण , उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, जिल्हा सचिव मिलिंद खानोलकर, सहसचिव विवेक पंडित, वकील सौ साधना धुरी, माजी नगरसेवक अमरजितसिंग आनंद हे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध भागातील नामांकित मिसळवाले, खरवस , पान यांचा सहभाग असून लज्जतदार चवीच्या मिसळीचा आस्वाद वसईतील खवय्यांना घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आयोजक शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण आणि विभागप्रमुख उमेश शिखरे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *