

महाराष्ट्रात ॲसिडची जागा हुंड्यानी घेतलीय आरसा मला रोज माझे प्रतिबिंब दर्शवतो , रोज नव्याने मी स्वत:ला पाहते आणि रोज नव्याने चेहऱ्यावरच्या जखमा विसरायचा प्रामणिक प्रयत्न करते असे . तिला ॲसिड नी जाळले माझ्या बाबतीत हुंडा ॲसिड ठरले ; हुंडाबळीच्या पिडीता कर्मविर स्नेहा जावळे बोलतांना म्हणाल्या . मोजक्या शब्दात त्या सहज रोजच्या वेदना सांगुन गेल्या . आज मी तुमच्यासमोर काही जुनेच मुद्दे नव्याने ठेवण्याचा प्रयत्न करतेय ; कारण गेले कित्येक वर्ष मी याव काम करत आहे . मला सासरच्यांनी हुंड्यासाठी जाळुन आता अठरा वर्ष उलटले पण तरी आजही मला जख्मांच्या वेदना सहन कराव्या लागतात मग ही वेदना अॅसिड पिडीतांची आणि कुठल्याही प्रकारे जळाल्यां गेलेल्या पिडीतांची वेदना ; तो दाह त्या आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या घटनेची आठवण सगळ सारखच असतांना समाजातील काही लोक आणि स्वत: अॅसिड पिडीतही इतर रित्या जाळलेले पिडीत आणि अॅसिड यात फरक का करतात ? असा प्रश्न स्नेहा जावळेंनी केला . स्नेहाजी म्हणतात जर त्या अग्नीचा दाह सर्वांसाठी सारखा तर मग समजातुन हा भेदभाव का ? मदत निधी ; नौकऱ्या ; किंवा फॅशन शो हे केवळ अॅसिड पिडीतां सोबत इतर पद्धतीच्या व हुंडाबळीच्या पिडीतांना का नौकरीची सवलत मिळत नाही ? महाराष्ट्रात आजही हुंडाबळी आहेत ज्यात केवळ ती पिडीता नव्हे तर त्या मागे तिचे कुटुंबही भावनिक रित्या तुटते तिला त्वरित न्याय का मिळत नाही ? ऍसिड ; बलात्कारा इतकाच हा विषय पणगंभिर आहे यावर महाराष्ट्र सरकारनी का कधीच या हुंडाबळी पिडीतांना नौकरीची सवलत दिली नाही ? का त्यासाठी अपंग विभागात राखीव सवलती नाहीत ? महाराष्ट्रात ॲसिड विकले जाते पण ॲसिड हल्याच प्रमाणनाहीच्या बरोबर आहे मग हुंडाबळी का संपत नाहीत हा माझा प्रश्न महाराष्ट्राला आहे .हा प्रश्न लवकरात लवकर संपवण्याची सरकारने ठोस पावले उचलावित ही माझी मागणी महाराष्ट्राच्या सरकारकडे आहे . आता आपण 2020 मध्ये पाऊल टाकले ; मुली चंद्रयान मोहीमेचा हिस्सा आहे ती इतकी कतृत्वान आहे तरी तिच्या लग्नासाठी कित्येक ठिकाणी हुंडा द्यावा लागतो ही खंत आहे इथली . मी हुंडाबळी स्नेहा जावळे सर्वांना विनंती करते आपण समाज म्हणुन आपल्या मुलीसाठी हुंडा देणे थांबवले पाहीजे . हुंडाबळी थांबला पाहीजे ## Stop Dowry Bride ##