पालघर जिल्हा हा शासनाने आदिवासी बहुल जिल्हा घोषित केला असला तरी.येथील आदिवासी समाजाकडे लक्ष्य द्यायला कोणीही राजकारणी किंवा पक्ष पार्टी तसेच शाशकिय अधिकारी यांना वेळ मिळत नाही त्याचाच एक भाग म्हणुन .पालघर जिल्हातील हजारो कुंटुब रोजगारासाठी नोव्हेबर ते मे महीन्यापर्यत वसई तालुक्यामधे स्थलांतरीत होत असतात व हि लोक सरकारी किंवा मालकी जागेत तात्पुरती झोपड़ी ( भोगा ) बांधून राहत असतात व मिळेल ते काम करत असतात त्याचाच एक भाग म्हनून वसई तालुक्यातील.भुईगांव या गावी पालघर जिल्हातील शेकडो कुंटुब मोकळ्या सरकारी व मालकी जागेत झोपड्या ( भोंगा ) राहत आहेत व आपल्या कुटुबाचा उदर निर्वाह करीत आहेत आज दिनांक २४/०४/२०१९ रोजी संध्याकाळच्या सुमारास जोराची हवा सुटली होती त्यामुळे मुख्य विद्युत वायर व लोकल.विद्युत वायर एकमेकाला स्पर्श होऊन स्पारकिग होऊन त्याच्या ठिणग्या झोपड्यावर ( भोंगा ) पडून पाच झोपड्या जळून खाक झाल्या आजूबाजूच्या लोकांनी बोरींगला असलेली पाण्याची मोटर चालू करून.आग विझवली सुदैवाने जीवित हाऩी झाली नाही परंतु सर्व संसार जळून खाक झाला गावकर्यानी त्याना तांदुळ कपडे इतर साहीत्य तातपुरते पुरवले आहे सदर.स्थलातरीत लोक हि पालघर जिल्हातिल कोडगाव येथील रहीवासी.असुन.ती रोजगारासाठी भुईगाव वसई येथे आलेले आहेत झोपड्या जलालेल्या लोकांची.नावे., १) दत्तू बसवत , २) मधू झाटे , ३) लक्ष्मण झाटे , ४) मंगली भोये , ५) प्रकाश मलावकर ,, सर्व.राहणार कोडगांव.पालघर ,, घटनेची माहीती मिळताच आदिवासी एकता परिषद वसई तालुका अध्यक्ष , दत्ता सांबरे , सचिन प्रकाश जाधव.यानी त्वरीत सदर ठिकाणी जाऊन मदत सहकार्य केले तसेच वसई पोलिस.स्टेशन यांना कळवून सदर पोलिस स्टेशन चे कुमावत साहेब यांनी घटना स्थली प्रत्यक्ष पाहणी करून पंचनाम्यासाठी झोपड्या जलालेल्या लोकांच्या नावाची नोद करून घेतली तसेच आदिवासी एकता परिषद वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे यांनी सदर लोकांना तहसिदार वसई यांच्या कडून काही मदत सहकार्य करता येईल.का यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *