
नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस महाराष्ट्र आणि कोमसाप विरार शाखेतर्फे मराठी भाषा व ग्रामीण पत्रकारितेला शासकीय स्तरावर योगदान काय या विषयावर शनिवारी १८ जानेवारी रोजी विरार पूर्वेकडील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता एका चर्चा मराठी भाषा संवर्धन परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी एन.यु.जे.महाराष्ट्र.च्या अध्यक्षा शीतल करदेकर व माजी आयुक्त कल्याण केळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम दुपारी ४.३० वाजता होणार आहे. राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जाहिर केला आहे. सध्याच्या घडीला मराठी भाषेच्या उत्कर्षा विषयी बरेच काही शासन स्तरावर बोलले जाते.भाषा संवर्धनाच्या घोषणाही अनेक होतात मात्र एकूणच भाषेची आजची स्थिती आणि गती काय आहे. महाराष्ट्रात निमशहरी व ग्रामीण भागात मराठी पत्रकारितेतून मराठी भाषेचे संवर्धन होते मात्र शासन वृत्तपत्रात बातमीदारी करणार्या पत्रकारांना भाषेप्रमाणेच संवर्धनकामी शासकीय योजनेतून कोणता न्याय देते की भाषेप्रमाणे त्यांचीही उपेक्षा होते.असाही एक प्रश्न समोर येतो.मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त या विषयावर या कार्यक्रमात साधक बाधक चर्चा होईल. पत्रकार व मराठी भाषा प्रेमींनी या कार्यक्रमाला आवर्जून हजर रहावे असे आवाहन एन.यु.जे.एम.चे पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई व कोमसाप चे पालघर जिल्हा सचिव उमाकांत वाघ यांनी केले आहे.