लाडके लोकनेते आमदार हितेंद्र ठाकुरजी यांच्या मार्गदर्शनान आणि नायगावकरांचे सभापती / नगरसेवक कन्हैया बेटा भोईजी म्हणजे बेटा दादा यांनी नायगावला सतत नवनविन कल्पनांचा आनंद दिला .
नायगाव पुर्वचे अध्यक्ष, लाडके व्यक्तीमत्व श्री धरेंद्र कुलकर्णीजीनी सांगितले की नायगावला आम्ही आप्पांच्या मार्गर्शनात इथे सतत नविव कल्पना राबवतो; म्हणुन या वेळी आम्ही खास संक्रांचीचे निमित्य साधुन इथे ” कमांन्डो सर्कस ” घेवुन आलोत .
याच बरोबरीने काही खाद्यपदार्थांचेही स्टाॅल आहेत ; लहान मुलांसांठी बोटींगची कल्पना आहे ; काही प्रमाणात खरेदीही करता येईलच ;त्याच बरोबरीने इतर खेळाचे स्टाॅलही आहेत.
यात प्रामुख्यानी लहान-मोठ्यांना आनंद देणारी कमांन्डो सर्कस आहे ; सर्कस आण्याचा मुख्य हेतु हा पण आहे की आम्ही अनुभवलेली ही वेगळी संस्कृती आपल्या मुलांनाही माहीती असावी त्याचा आनंद घेण्याची संधी या अताच्या मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना मिळावा असे अध्यक्ष धरेंद्र कुलकर्णीजी बोलतांना सांगत होते .
आप्पांच्या सानिध्यात व मार्गदर्शनात आम्ही सतत नव-नविन गोष्टी शिकत असतो , आणि नायगाव-जुहुचंद्रा इथल्या रांगोळीची ; चित्रकारांची ओळख जगभरात आहे , म्हणुन आम्ही नविन कल्पना व लयास जाणारी संस्कृती यांची जोपासणा करण्यासाठी ; सध्याच्या कलाकारांना कलेना प्रोत्साहन देण्यासाठी व यातुनच भविष्यांचे कलाकार जन्माला यावेत यासाठी अश्या कल्पना आप्पांच्या मार्गदर्शनात राबवत राहु असे मत श्री धरेंद्र कुलकर्णींनी व्यक्त केले .
नायगाकरांसाठी ही सर्कस व त्याचा आनंद १६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२० पर्यंत सर्वांना घेता येईल .
काल पहिला दिवस असतांनाही नायगावकर थंडीतही या सर्कस चा आनंद घेतांना मित्र परिवार व कुठुंबासह दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *