
आम्ही भारताचे नागरिक भारतीय संविधानाचा प्रचंड आदर करतो. भारतीय संविधानाचा अनादर करून देशात धर्माच्या नावाखाली जो हुडगुस घातला जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो.
देशातील युवक देशाचे भविष्य आहे. देशातील युवकांचे भविष्य घडविण्यात देशातील विद्यापीठाचे मोठे योगदान आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ जे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले आहे. त्या विद्यापीठात गुंड प्रवृत्तीच्या ज हाल संघटनानी विद्यार्थांना बेदम मारहाण केली. जमिया इस्लामिक विद्यापीठ, जाधव पूर विद्यापीठ आदी विद्यापीठात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हैदोस घातला आहे. त्यास केंद्रातील सरकार चे समर्थन असल्याचे आमचा आरोप आहे.
या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वधर्मीय संविधान बचाव समिती तर्फे शनिवार दिनाक १८ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान नवघर राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो समोर संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने निदर्शन आंदोलन करणार आहोत.
तरी सर्वांना विनंती आहे की या आंदोलनात सहभागी होऊन देशातील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवू या.
