
वसई :- २२ पालघर लोकसभा निवडणुकीच वातावरण चढत्या ऊना बरोबर तापू लागल आहे. त्यामुळे राजकीय पक्ष एकमेकाचे वाभाड़े काढण्यात मग्न आहेत, या पार्श्वभूमिवर सुजाण मतदार राजा आपण कोणाला मत देणार याच गणित आधीच तयार करून बसला आहे. वसई मधील सत्ताधारी बविआ ला या निवडणुका तितक्याश्या सोप्या नाहीत. सेना भाजप युतीच कड़वे आव्हान समोर उभ असताना वसई मधील नाराज गट हेरुन सेनेने आपली रणनिती तयार केली आहे. बविआ चे सुस्त आणि मुजोर नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामुळे या भागात मतदार आधीच नाराज आहेत. ही नाराजी इतकी तीव्र आहे, त्याची जागा संतापाने घेतली आहे. पाचुबंदर , किल्ला बंदर येथील हाच पारंपारिक मतदार आता सेने सोबत गेला आहे.* *_मागील पाच वर्षात या भागातील छोट्या समस्याही सोडवू न शकलेल्या तसेच हिंदू मतदाराना दुखावुन धार्मिक संस्थेत मनमानी करून तर कधी आ. हितेंद्र ठाकुर यांच्या नावाने धमक्या देऊन नाराज केले. याबरोबरच सामाजिक संस्थेतही हीच मगृरी करून सदर मतदारांचा रोष या भागात बविआच्या पदाधिकाऱ्यानी ओढवून घेतला आहे. सन २०१८ लोकसभेच्या निवडणुकीत ६४,४७८ इतके मोठे मताधिक्य् बालेकिल्ला असलेल्या वसई मधून बविआ ला मिळाले होते. आता हे मतदान शिवसेनेला जाणार हे उघड आहे. तसेच काहीनी नोटाचा पर्याय बोलून दाखवला आहे. काहीही झालं तरी या भागातून बविआ ला मतदान करणार नाही अश्या मानसिकते पर्यन्त मतदार आले आहेत. त्यामुळे बालेकिल्ल्याला मोठ भगदाड पडल्यास नवल नसावे. हीच स्थिति मर्सिस, होळी, दीघा, भाटघर वाड़ी परिसरात आहे. तात्कालीन सभापती प्राची कोलासो यांच्या कार्य पद्धतीमुळे हवालदिल झालेले तसेच दोन्ही भागातील पिण्याच्या पाण्या पासून वंचित ठेऊन पक्षाचे अंतर्गत वाद, कुरघोड़ीचे राजकारण करणाऱ्याना चांगली अद्ल घडवण्याचे मतदारांची भूमिका बनली आहे.कौलार, गिरीज, सांडोर येथेही थोड्या फार फरकाने लोकांनी सेना किंवा नोटा असे दोन पर्याय योजले आहेत. यामुळे बविआ ला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार हे उघड आहे. मागील पाच वर्षात पक्षाचे हाय कमांडही अनभिज्ञ होते वा त्यानाच स्वारस्य नव्हते. काहीनी या बाबत पुराव्या निशी तक्रारी, गाऱ्हाणी प्रवक्ते अजीव पाटील यांच्याकडे सादर केले होते. त्याची योग्य वेळी दखल घेतली गेली नाही. एरव्ही भरभरुन मतांचे दान करणारे येथील मतदार यावेळी कटाक्षने अलिप्त आहेत. आता या चुका दुरुस्त करून मतदार आपल्या बाजूने फिरवण्याची वेळही निघुन गेली आहे. सेना भाजप युतीला चेकमेट देण्यासाठी बविआ ला ५ लाखा पेक्षा जास्त मते हवी आहेत. पोट निवडणुकीत २,२२ हजारावर बविआ ला गाशा गुंडाळावा लागला होता. ही स्थिती पहाता राजकीय दृष्ट्या वसई मधून आणखी कठिण अवस्था आहे. पाच वर्षात जाणीवपूर्वक दुर्लक्ष,गृहीत धरल्याचे विपरीत परिणाम, पदाधिकाऱ्यांची मनमानी, अंतर्गत वाद, नागरीकाना सोई सुविधेची वनवा, मनपा भ्रष्टाचाराची नव्याने आलेली प्रकरणे इतकी कारणे असताना केवळ करोड़ो ची विकासकामे दाखवून निवडणुकीच्या तोंडावर किती काळ मुर्ख बनवणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. वसई मधली नाराजी यावेळी बविआ ला चांगली भोवणार हे उघड आहे. त्यासाठी राजकीय विश्लेषकाची गरज भासणार नाही. |