

रविवार दिनांक 19 जानेवारी 2020 रोजी हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षाप्रमाणे संवर्धन मोहीम केळवे व किल्ले वसई मोहीम परिवार तर्फे हा दिवस साजरा करण्यात आला. नेहमी प्रमाणे पालखीचे स्वागत श्री शितलादेवी मंदिर येथे करण्यात आले. यंदाचा आदल्या दिवशी चा पालखीचा मान तांदुळवाडी गावास प्रदान करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी श्री शितलादेवी मंदिर ते केळवे जंजिरा किल्ल्यापर्यंत पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर पालखी मिरवणुकीत अंजुर नाईकांचे वंशज व गणेश मंदिर, भिवंडी अंजुर चे अध्यक्ष श्री. सुभाष नाईक हे उपस्थित होते. तसेच शिवस्पर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष व व श्री दुर्गराज रायगड राज्याभिषेक दिनोत्सव समिती चे कार्याध्यक्ष श्री. शेखर मामा फरमन व त्यांचे सहकारी हे भिवंडी हुन उपस्थित होते. या पालखी सोहळ्यात शुभदा महिला मंडळ केळवे अध्यक्ष श्रीमती भारती सावे व मंडळाच्या महिला सदस्यांनी देवीची ओटी भरण्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या दिनाचे महत्त्व सांगण्यासाठी इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीदत्त राऊत हे स्वतः उपस्थित होते. पालखी मिरवणुकीचे युवक मित्र मंडळ केळवे बाजार व मांगेलआळी येथे उत्साहात स्वागत व पूजन करण्यात आले. केळवे जंजिरा येथे पालखी समारोपाच्या वेळी गडकोट संवर्धनात कार्यरत असलेल्या युवाशक्ती प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ भक्तगण या संस्थांचा संवर्धन मोहीम केळवे तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यास ग्रामस्थ श्री. उमेश पालेकर, जयेश राऊत, प्रदीप बारी व उपसरपंच श्री. सदानंद राऊत, ग्रामपंचायत सदस्य श्री. तुषार पाटील, नितीन राऊत हे आवर्जून उपस्थित होते. सदर कार्यक्रमास कल्याण ठाणे भिवंडी मुंबई इ येथून इतीहास प्रेमी उपस्थित होते.
Awesome post! Keep up the great work! 🙂