

CAA, NRC विरोधात तापलेलं वातावरण कायम ठेवण्यासाठी विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. त्याला पाठिंबा म्हणून रिपाइंचे राष्ट्रीय नेते व सरचिटणीस राजेंद्र गवई यांच्या आदेशानुसार पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी यांनी या बंदला पालघर जिल्ह्यात पाठिंबा दिला आहे . CAA, NRC मुळे देशात भयाच वातावरण आहे. 24 जानेवारीला अर्थव्यवस्थेबाबत केंद्र सरकरने 27 लाख कोटी देश चालवण्यासाठी आवश्यक असं बजेटमध्ये म्हटलं होतं. मात्र आतापर्यंत 11 लाख कोटी जमा झाले आहेत त्यामुळेच डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि CAA, NRC विरोधात 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यात विविध कामगार संघटना आणि मुस्लीम संघटना सहभागी होणार असुन सर्वच रिपाइं नेत्यांनी गट तट विसरुन या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा घोषित केला आहे.