दि.‌‌ २६ जानेवारी २०२० रोजी युवक मित्र केळवे व एड डी एफ सी बँक पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कच्छ युवक संघ पालघर यांच्या मदतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरास १०५ रक्तदात्यांचे अमुल्य असे योगदान लाभले.
गेल्या वर्षी म्हणजे २६ जानेवारी २०१९ रोजी युवक मित्र मंडळ केळवेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात अशाच भव्य रक्तदान शिबिराने झाली होती.
गेल्या वर्षभरात युवक मित्र मंडळ केळवे यांनी विविध प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले होते.
सर्वधर्म समभाव, महिला सक्षमीकरण, पारंपारिक पद्धतीने बनविलेल्या पाककृती, रांगोळी स्पर्धा, भव्य चित्रकला स्पर्धा, माहेरवाशीण आल्या घरी या सारख्या विशेष उल्लेखनीय उपक्रमांची मांदियाळी या वर्षभरात मंडळाने आयोजित केली होती.
सार्वजनिक नवरात्रौत्सव, दहिहंडी, रामनवमी तसेच मुस्लिम व ख्रिश्चन बांधवांच्या विविध उत्सवात सर्व धर्मीय लोकांचा सहभाग हे या मंडळाचे वैशिष्ट्य.
सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या यशस्वी घौडदौडीनंतर यापुढेही असाच वारसा मंडळ पुढे नेत राहील असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *