

वसई : 71व्या प्रजासत्ताक दिनी भाजपा वसई रोड मंडळाकडून उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वसई रोड मंडळ परिसरात ठीकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले व बाईक रॅली काढण्यात आली. कर्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता वसई पूर्व येथील ब्रॉडवे सिनेमागृहा समोर असलेल्या भाजपा वाचनालयासमोर वसई मंडळाचे पदाधिकारी बाळा सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी मुख्याध्यापिका शिखा गांगुली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व वसई पूर्व ते पंचवटी नाका अशी बाईक रॅली काढण्यात आली. 8.30 वाजता पंचवटी नाका येथे शहर सचिव गोपाळ परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुधांशु चौबे यांनी मागदर्शन केले. मंडळाचे पदाधिकारी रमेश पांडे, कांचन झहा, ज्ञानेश्वर पवार व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. 9.00 वाजता अंबाडी नाका येथे शहर उपाध्यक्ष महेश सरवणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मंडळाचे पदाधिकारी विद्याधर शेलार, अमृत मानकर व नागरिक उपस्थित होते. 9.15 वाजता पार्वती सिनेमागृह समोर युवा सचिव बिशाल बाला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजदेव सिंग, वैभव शिंद्रे, सुरेश देशमुख, चिराग पितडीया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 9.30 वाजता साईनगर येथील साईबाबा मंदिर जवळ लालजी कोनोजिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कल्पेश चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मंडळाचे पदाधिकारी इकबाल मुखी, सुरेश हेगडे आदी पदाधिकारी व स्थानिक नागरीक उपस्थित होते. 9.45 वाजता साईनगर येथील भाजपा कार्यलय येथे मनोज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. 10.00 सिद्धिविनायक नगर येथे विभाग सचिव अपर्णा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले. यावेळी समारोप भाषण मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी, कम्युनिस्ट पक्षावर टीका केली. नागरी सुधारणा विधेयक जे देशाच्या पवित्र अशा दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे व देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी ज्यावर स्वाक्षरी केली असताना कम्युनिस्ट पक्ष नागरी सुधारणा विधेयकाबद्दल नागरिकांमध्ये चुकीच्या गोष्टी पोचवुन अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. व त्यांचे हे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत अशी टीका त्यांनी केली.
उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी सिद्धेश तावडे, के डी पांडियन, अर्जुन इंगोले, मार्कंडेय पांडे, महिंदर सिंग कोहली,अरुण कुमार, सुगंधा खानोलकर, उषा आमीन आदी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.