

राजेंद्र गावित यांची प्रचार रॅली
शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांची बोइसरमध्ये निवडणूक प्रचार रॅली काढण्यात आली. या वेळी हजारो स्थानिक नागरिक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
महायुतीचा बालेकिल्ला असणाऱ्या पालघर लोकसभा मतदारसंघातील बोईसर परिसरात महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी शिवसेनेने शनिवारी मतदारसंघातील विविध भागांत पदयात्रा आणि प्रचार रॅलींचे आयोजन केले होते. या प्रचार रॅलीच्या वेळी हजारो स्थानिक नागरिक तसेच महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने परिसरातील वातावरण भगवेमय झाले होते. गोखिवरे, तुंगारेश्वर फाटा आणि बोईसर शहरातील चौकाचौकांत गावित यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.