

वसई, दि. 30 (प्रतिनिधी) ः वसईच्या हाथीमोहल्ला परिसरातील अनधिकृत इमारतीवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश खासदार राजेंद्र गावित यांनी निर्गमित केले आहेत. या इमारतीच्या बिल्डरला अभय देणार्या पालिकेच्या अधिकार्यावरही कारवाई करण्याचे खासदार गावित यांचे निर्देश आहेत. सदरची इमारत अनधिकृत असतानाही महापाकिा कारवाई करत नसल्यामुळे तक्रारदारांनी खासदार गावित यांच्याकडे गार्हाणे मांडले होते. त्यानुसार आज खा. गावित यांनी सदर इमारतीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक-110 मध्ये वसई गावातील मुसाजी गल्लीतील ‘हाजरा मंझील’समोर ‘स्टार बिल्डर अँड डेव्हलपर्स’चे अझहर खान, नदीम खान, हमीद खत्री, खालीद खान यांनी तळ अधिक चार मजली इमारतीचे बांधकाम केले होते. मात्र सीटीएस नं. 1503 व 1504 या जागेवरील 20 एप्रिल 2013 ची बांधकाम परवानगी 19 एप्रिल 2017 रोजी चार वर्षे पूर्ण झाल्याने रद्द झाली होती. त्यानंतरही या इमारतीचे बांधकाम सुरू होते. शिवाय त्यात वाढीव बांधकाम करण्यात आल्याने पालिकेने या इमारतीला ‘एमआरटीपी’ची नोटीस बजावण्यात यावी, अशी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार, वसई-विरार शहर महापालिकेने या अनधिकृत इमारतीचे बांधकाम तातडीने थांबवावे, अशा आशयाची नोटिस 22 एप्रिल 2019 रोजी स्टार बिल्डर अँड डेव्हलपर्सला बजावली होती. त्याआधी 17 जुलै 2018मध्ये या इमारतीची सर्व ती कागदपत्रे पालिकेत सादर करावीत, असे आदेश तात्कालिन प्रभारी साहाय्यक आयुक्त रतेश किणी यांनी बजावले होते. त्यानंतरही हे काम सुरू राहिल्याने पालिकेने 5 मार्च 2019 रोजी या इमारतीचा पंचनामा केला असता हे बांधकाम अनधिकृत असल्याचे आढळले होते. शिवाय त्यात वाढीव बांधकाम केल्याचेही निदर्शनास आले होते. त्याआधी 11 एप्रिल 2018 मध्येही या इमारतीचा पंचनामा झाला होता.
विशेष म्हणजे 26 मार्च 2019 रोजी पुन्हा एकदा या इमारतीला नोटीस बजावण्यात आली होती. त्यात हे बांधकाम परवानगी रद्द केल्यानंतरचे आहे, वाढीव बांधकामास परवानगी घेतली नाही, अनधिकृत बांधकाम त्वरित पाडण्यात यावे, अनधिकृत बांधकाम विनाविलंब थांबवण्यात यावे व अनधिकृत वापर तातडीने बंद करावा, असे शेरे मारण्यात आले होते. ही नोटीस तात्कालिन प्रभारी साहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी यांनी बजावली होती. त्यानंतरही या चौघांनी पालिका आदेश धुडकावून इमारत उभी केल्याने तात्कालिन प्रभारी साहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी यांनी एमआरटीपीची नोटीस बजावून 25 एप्रिल 2019 रोजी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार स्टार बिल्डर अँड डेव्हलपर्सचे भागीदार असलेले अझहर शेख, नदीम खान, हमीद खत्री, खालीद खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, तक्रारदाराने या प्रकरणी खासदार राजेंद्र गावित यांच्याकडेही तक्रार केली होती. आज खा. गावित यांनी या प्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याचे तसेच बिल्डरला संरक्षण देणार्या पालिकेच्या अधिकार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जारी केले. हाथीमोहल्ल्यातील अनधिकृत इमारतीवर लवकरच हातोडा ; तसनिफ नूर शेेख याच्या पाठ पुरावाला यश