वसई : (प्रतिनिधी) : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाची सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली असून पारदर्शक मतदानासाठी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष प्रशिक्षण घेण्यात येत आहे. यंदा पालघ लोकसभा मतदारसंघासाठी सुमारे 18 लाख 85 हजार 297 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये 9 लाख 89 हजार पुरूष तर 8 लाख 96 हजार 186 महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच इतर 111 व्यक्तीदेखील मतदानाा हक्क बजावणार आहेत. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्ष या महाआघाडीचा सामना शिवसेना-भाजप महायुतीशी होणार आहे. निवडणुकीच्या रणांगणात एकूण 12 उमेदवार असले तरी खरा सामना हा बविआचे बळीराम जाधव आणि शिवसेनेचे राजेंद्र गावित यांच्यातच रंगणार आहे.ङ्ग पालघर लोकसभा मतदारसंघात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, विक्रमगड आणि डहाणू असे विधानसभा मतदारसंघ आहेत. सहाही मतदारसंघांमधील सर्वच पक्षांवी राजकीय ताकद मोजायची झाली तर जिल्ह्याच्या उर्वरीत भागात शिवसेना-भाजप यांची तगडी ताकद आहे. तर वसई-विरार उपप्रदेशात बहुजन विकास आघाडीची तगडी ताकद आहे. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार निवडून आले आहेत. या तिन्ही मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीला चांगला जनाधार आहे. तर विक्रमगड आणि डहाणू हे दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत. तर अवघा पालघर हा एकमेव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. जिल्ह्यात केवळ एक आमदार असतानाही केवळ राजकीय तडजोडीपोटी शिवसेनेला पालघर लोकसभा मतदारसंघ देण्यात आला आहे. जिल्ह्यात शिवसैनिकांची ताकद विखुरलेली असली तरी ही ताकद मोठी आहे. पोटनिवडणुकीत शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे दुसर्‍या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते. तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे तिसर्‍या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते. पालघरमधील विधानसभानिहाय मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे :* डहाणू विधानसभा मतदारसंघ :पुरूष मतदार – 1 लाख 36 हजार 106, महिला मतदार – 1 लाख 33 हजार 874, इतर – 8 असे एकूण 2 लाख 69 हजार 988 इतके मतदार आहेत.* विक्रमगड विधानसभा मतदारसंघ :पुरूष मतदार – 1 लाख 33 हजार 753, महिला मतदार – 1 लाख 30 हजार 379 असे एकूण 2 लाख 64 हजार 132 मतदार आहेत.* पालघर विधानसभा मतदारसंघ :पुरूष मतदार – 1 लाख 37 हजार 753, महिला मतदार – 1 लाख 33 हजार 313, इतर 16, एकूण 2 लाख 71 हजार 167 मतदार आहेत.* बोईसर विधानसभा मतदारसंघ :ङ्गपुरूष मतदार – 1 लाख 60 हजार 799, महिला मतदार – 1 लाख 37 हजार 92, इतर 24, एकूण 2 लाख 97 हजार 915 मतदार आहेत.* नालासोपारा विधानसभा मतदारसंघ :पुरूष मतदार – 2 लाख 68 हजार 700, महिला मतदार – 2 लाख 18 हजार 804, इतर 56, एकूण 4 लाख 87 हजार 560 मतदार आहेत.* वसई विधानसभा मतदारसंघ :पुरूष मतदार – 1 लाख 51 हजार 804, महिला मतदार – 1 लाख 42 हजार 724, इतर 7, एकूण 2 लाख 94 हजार 535 मतदार आहेत.असे एकूण 18 लाख 85 हजार 297 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.विधानसभानिहाय पोलिंग बुधची संख्याडहाणू : 327 पोलिंग बूथविक्रमगड – 348 पोलिंग बूथङ्गपालघर – 322 पोलिंग बूथबोईसर – 353 पोलिंग बूथङ्गनालासोपारा – 489 पोलिंग बूथवसई – 338 पोलिंग बूथङ्गअसे पालघर जिल्ह्यात एकूण 2 हजार, 177 पोलिंग बूथ असणार आहेत.सोमवार दि.29 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया संपन्न होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *