
प्रतिनिधी : १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर नगर (आगाशी), भीम नगर (सत्पाला), पंचशील नगर (रानगांव) अशा वसई पश्चिम पट्टयातील अनेक गावांमध्ये शिवजयंती निमित्ताने अनेक असे समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. आंबेडकर नगर आगाशी येथे दुपारच्या वेळेस लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सायंकाळी बुधवारची साप्ताहिक बौद्ध वंदना असल्या मुळे सामुदायिक वंदना घेण्यात आली. आगाशी विभागातील अनेक समाजसेवक सदर कार्यक्रमात उपस्थित होते मान्यवरांमध्ये महेश जाधव, ज्योती कडू (माजी सभापती), महेंद्र कापसे, महेश भोइर, यांनी आपल्या भाषणात शिवरायांबद्दल अतिशय मोलाचे विचार मांडले. विशेष म्हणजे आंबेडकर नगर भुईगाव डोंगरी मधून आलेली साक्षी प्रमोद मोरे हिने शिवरायांबद्दल व आजचा तरुण तरुणी यांनी कसे राहावे व कसे वागावे या विषयावर अतिशय सुंदर असे भाषण केले आणि ते सर्व उपस्थित नागरिकांना पटले सर्वांनी साक्षीची स्तुती केली. आगाशी आंबेडकर नगर मधील अध्यक्ष यांनी साक्षी हिला गुच्छ देऊन सन्मानित केले. त्याच प्रमाणे भिम नगर सत्पाला येथे सुध्दा शिवजयंती उत्साहात साजरी झाली. सदर कार्यक्रमात महिलाचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता. गावातील पदाधिकारी यांच्या हस्ते वयोवृद्ध महिलांना भेट वस्तू देण्यात आले. त्याच प्रमाणे पंचवीस नगर (रानगांव) येथे सुध्दा मिरवणूक व लहान मुलानी महापुरुषांच्या वेशभूषा करून शिवजयंती साजरी केली. आगाशी आंबेडकर नगर मधील जयंती कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी जय भिम मित्र मंडळ व महिला यांनी मोलाचे योगदान दिले. आलेल्या सर्व मान्यवराचे आभार अध्यक्ष रत्नाकर वागळे व समाजसेवक प्रभाकर वागळे यांनी मानले.
Great content! Super high-quality! Keep it up! 🙂