

आमदार ठाकुरांचे काम बोलते याचा प्रत्यय वारंवार आम्हाला येतो ; आजचे काम हे याचा पुन्हा अनुभव देणारे आहे .
आमदार मा. हितेंद्र ठाकुर ( आप्पा) यांच्यामुळे त्वरित कार्यवाही झाली यामुळे ग्लोबल अरेना व टिवरी , नायगाव पुर्व इथल्या रहिवास्याना त्वरित दिलासा मिळाला. आप्पांच्या सांगण्यावरुन सनटेकच्या कर्मच्याऱ्यांनी रस्त्यांला ; जमिनीला भेगा पडु नये व बाकीच्या इमारतींना धोका निर्माण होणार नाही याची उपाय योजना चालु केली . आमदार मा. हितेंद्र ठाकुरजींचे इथले रहिवासी मनपुर्वक धन्यवाद करतआहेत.
या विषयी सविस्तर माहिती अशी की ;आज सकाळी साधारण ७;३० ते ८;३० च्या दरम्यान ग्लोबल अरेना , टिवरी , नायगाव पूर्व येथील मुख्य द्वारा जवळचा रस्ता पूर्णपणे खचला.
सुदैव्याने काही जीवितहानी झाली नाही. ह्या सगळ्या प्रकारास मुख्य कारण जे सनटेक बिल्डर चे चालू असलेले नवीन इमारतीचे काम कारणीभूत आहे.
जे काही कामे चालू आहेत तिथे खबरदारी म्हणून काहीच उपाययोजना घेतल्या गेल्या नाहीत.
ह्या मुळे येथील ग्लोबल अरेना , नक्षत्र प्रायमस ह्या सर्व इमारतींना धोका निर्माण झाला असता . हा मार्ग पुर्णपणे बंद केल्यास येथील रहिवाशीयांचा बाहेरचा पुर्णपणे संपर्क तुटला होता . बाहेर जाण्यासाठी येथील रहिवास्यांना कुठलाही पर्यायी रस्ता नव्हता ही बातमी आमदार ठाकुरांना कळताच त्यांनी याची दखल घेवुन त्वरित योग्य ती उपाय योजना करण्यास सांगितले .
रोजच्या कामावर जाणारे तसेच लहान मुलांचे शाळेत जाण्याचा मार्गच पूर्णपणे बंद झाला आहे.
वेळीच खबरदारीचे उपाय न घेतल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती
ह्या सर्व प्रकारास कारणीभूत असलेल्या सनटेक च्या अधिकाऱ्यांना नायगाव पुर्वचे सभापती/ नगरसेवक कन्हैया भोईर म्हणजे बेटा दादांनी त्वरित सनटेकच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलुन उपाय योजना चालु केली या साठी ग्लोबल अरेनाचे रहिवास्यांनी नगरसेवकांचे आभार मानले .