

वसई : अनेक दिवसांपासून भाजपच्या संघटनात्मक निवडणूक राज्यभरात चालु होत्या यामध्ये काल वसई-विरार जिल्हाध्यक्ष पदी नालासोपाऱ्याचे राजन नाईक यांची वर्णी लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा वसई रोड चे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी नवनियुक्त जिल्ह्याध्यक्ष यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी, राजन नाईक आणि माझे अनेक वर्षांपासूनचे संबंध! त्यांची एका शब्दात ओळख करून द्यायची झाल्यास “प्रसन्न” व्यक्तिमत्त्व अशी केली तर वावगे ठरणार नाही… हसतमुख असा स्वभाव असणारे हे माझे मोठे भाऊ आज जिल्हाध्यक्ष झाल्यामुळे येणाऱ्या काळात वसई-विरारला त्यांच्या रूपाने भाजपा परिवाराला संघटनात्मक बळ नक्कीच मिळेल ह्याचा मला आत्मविश्वास आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या वसई-विरार महापालिका निवडणुकीत याचा नक्कीच भाजपाच्या सर्व उमेदवारांना फायदा होणार यात कोणाचेही दुमत नसेल. सामवेदी ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक असलेले राजन नाईक लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसंघाशी जोडलेले असल्याने वसई विरार भाजपाला त्यापद्धतीची संघटनात्मक शिस्त व एकप्रकारचे बळ येईल व याचा फायदा येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये भाजपाला होईल! अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना त्यांनी दिली.
