

युवाशक्ती फाऊंडेशन नायगाव पुर्व भागात सातत्यानी कार्य करत असते ; काल दि.१ मार्च ला नायगावच्या युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी गरजु महिलांसाठी सॅनेटरी पॅकचे वाटप करण्यात आले व महिलांना मासिक पाळीच्या बाबतीतल्या शंका निरसण करण्याचे व मासिक पाळीच्या वेळी स्वत:ची काळजी कशी घ्यावी यावर संस्थापक कर्मविर स्नेहाताई जावळे यांनी माहिती दिली. यावेळी महिलांनी पण स्वत:हुन चर्चेत भाग घेतला ; आणि प्रश्न-उत्तरातही चर्चा सत्र छान रंगले होते .
या कार्यक्रमाचे अवचित्य साधुन नायगाव पुर्वच्या युवाशक्ती सदस्यांचे ओळख पत्र देण्याचे कार्यही व्यवस्थित पार पडले . ओळख पत्र मिळाल्यांनी सदस्यांचा आनंद तर द्विगुणीत झालाच पण त्याच बरोबर सदस्यंचा उत्साह पण वाढलेला जाणवला.
नायगाव पुर्वची अध्यक्ष सौ हर्षला डिके, उपाध्यक्ष सौ. विद्या गउल; सल्लागार हेलन खंडारे ;सदस्य जोस्विन अल्मेडा, रोजलिन मार्गरेट , सौ. सरोज , सौ. शारदा जस्वाल , युवा सदस्य कु.वैभवी गउल , कु. माहेश्वरी गउल ;सर्वाचे युवाशक्ती परिवारात खुप खुप स्वागत आणि ओळख पत्र देण्यात आले त्यासाठी सर्व सदस्यांचे अभिनंदन !!
युवाशक्तीच्या संस्थापक कर्मविर स्नेहाताई जावळे बोलल्या आवर्जुन सांगावे वाटते की मासिक पाळी व स्वत:ची काळजी या बाबत महिलांमध्ये जागरुकता वाढत आहे , हे पाहुन खरच आनंद झाला . याच बरोबर त्यानी मदतीचा मागणी सर्वांना केलीय की काही गरजु बालकांसाठी वय वर्ष ६ महिने ते १७ महिन्याच्या मुलांसाठी आम्हाला सॅरेलॅक्स या अन्न पावडरची गरज आहे . इच्छुक मदत करणाऱ्यांनी युवाशक्ती फाऊंडेशन कडे संपर्क साधुन कृपया मदत करावी.
नायगाव पुर्वचे समाजसेवक व बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष मा. धरेंद्र कुलकर्णीचे संपुर्ण युवाशक्ती फाऊंडेशन मनापासुन आभार मानते ; सामजिक मदतीसाठी मा. धरेंद्र कुलकर्णी एका हाकेवर मदत करतात याचा अनुभव वारंवार आलेला आहे , यासाठी युवाशक्ती फाऊंडेशन आपले सदैव आभारी आहे .