आज दिनांक 03 मार्च 2020 रोजी आ.गीता भरत जैन यांनी खालील विषयावर विधान सभेत औचित्याचा मुद्दा मांडला.
“मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील जमिनीचा विकास करताना विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या डी.पी. रोड, मैदाने, गार्डन, इत्यादीसाठी विविध आरक्षणातील जागा महानगरपालीकेकडून नोंदणीकृत करारानुसार हस्तांतरण करुनही प्रत्यक्ष ताबा अद्याप महानगरपालीकेला दिलेला नसल्याचे माहे जानेवारी, 2020 मध्ये निदर्शनास आले आहे. महानगरपालीकेकडून नोंदणीकृत केलेल्या करानुसार सदर जागेचा प्रत्यक्षात विविध आरक्षणाखाली वापर होत आहे महानगरपालीकेने तसेच स्थानिक लोकप्रतीनिधिनी  विकासकाकडून नोंदणीकृत केलेल्या करारनाम्यानुसार विहित नमुन्यामध्ये आवश्यक त्या कागदपत्रासह सदर जागा महानगरपालीकेच्या नावावर करण्यासाठी तहसीलदार ठाणे यांच्या कडे पत्र व्यवहाराव्दारे मागणी करूनही तहसीलदार कार्यालयाकडून या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे यामुळे मनपाकडून जागा मालकांना भोगवाटा दाखला, FSI  तसेच इतर दाखले देण्यास विलंब होत असून सदरच्या विलंबामुळे तसेच पर्यायाने महानगरपालिकेच्या नकारामुळे शहरातील विकासाकाना व नागरिकाना  त्याचा मोठ्याप्रमाणावर त्रास होत आहे”.यावर आ.गीता जैन यांनी शासनाकडे त्वरित कारवाहीची मागणी केली असता विधानसभा अध्यक्षांनी यावर कारवाई करण्याचा आदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *