

●आदिवासींमधील बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण तसेच कुपोषण मुक्तीच्या अनुषंगाने स्थापन कृती दलाकडून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील खाटांच्या क्षमतेत वाढ व श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
●जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांच्या सद्यस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी तेथील डॉक्टर, परिचारिका व अन्य रिक्त पदे त्वरीत भरण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
●जिल्ह्यातील सूर्या धरण, कवडस, देहती व लेंडी प्रकल्प आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या धरणांचे पाणी स्थानिकांना पिण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. स्थानिकांना पिण्याचा पाण्याची टंचाई होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
●जिल्ह्यात होणाऱ्या भूकंपांच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली. नागरिकांना आवश्यक ते तात्पुरता निवाऱ्याच्या अनुषंगाने कापडी तंबू, ताडपत्र्या पुरविण्यात येत आहे. तसेच मुंबई आयआयटी ने अभ्यास करुन येथे भूकंपांचे धक्के सहन करु शकतील अशी ‘रेट्रोफीटिंग’ घरे बांधण्याची शिफारस केली आहे.
●तारापूर अणुशक्ती केंद्राच्या परिसरातून आणीबाणीच्या प्रसंगी जलद गतीने बाहेर पडता यावे यासाठी रस्त्यांचा आराखडता तयार करावा असेही मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीत रस्ते,पूल, वसई-विरार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जागा,वीज उपकेंद्रे सुरू करणे, प्रादेशिक आराखडा याबाबत चर्चा करण्यात आली.