


बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांनी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवास स्थानी भेट घेऊन पुढील निवडणुकांबाबत चर्चा केली आहे.बहुजन महापार्टी आतापर्यंत एकला चालो रे ची भूमिका होती.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे विचार व आमच्या पक्षाचे विचार एकच असल्याने पुढील निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत बहुजन महापार्टी जाऊ शकते.भारतीय जनता पार्टी समाजात तेढ निर्माण करून हिंदू मुस्लिम समाजातील लोकांमध्ये असलेले सलोख्याचे संबंध तोडू पाहत आहे अशा लोकांना सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे बहुजन महा पार्टी याबाबत योग्य ते निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जाणार आहे असे बहुजन महापार्टीचे राष्ट्रीय महासचिव शमसुद्दीन खान यांनी सांगितले आहे.