कर्मवीर स्नेहाताई जावळे याचे वृतकाव्य

महानगर पालिका निवडणुक

महानगर पालिका निवडणुकेची
घोषणा झाली .
कार्यकत्यांनी बायकांसाठी तिकिटाची
मागणी सुरु केली .
काहीनी कार्यक्रम ठेवुन पक्ष श्रेष्ठींचे
लक्ष वेधन्याच नाटक केल .
महिलांची गर्दी वाढवण्याचा अटाहास,
साड्यांचे वाटप केल .
समाजसेवा करायला सेवाभाव रक्तात
असावा लागतो .
वरवर वस्तु वाटपात दिखाव्यातला खोटा
सेवाभाव लोकांना कळतो .
निवडणुकीच्या तोंडावर काम करुन जनता
तरी फसेल का ?
दोन- तिन कार्यक्रमाच्या जोरावर नगरसेवक
पदाचे तिकिट मिळेल का ?
हाडाच्या समाजसेवकांना पदाची , तिकीटांची
नसते अपेक्षा .
कामची आवड असणाऱ्यानी घेतलेली असते
जनसेवेची दिक्षा .
बघु नगर पालिकेच्या रिंगणात कोणा कोणाला
मिळेल तिकीट .
वेळच ठरवेल कोण विजयी आणि कोणाची
पडेल विकेट .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *