

नगरसेवक पदाचे तत्काल तिकिट ?
उठा उठा महानगर पालिकेची
निवडणुक तोंडावर आली .
नगरसेवक पदाचा फाॅर्म भरण्याची
वेळ सुरु झाली .
कतृत्व शुन्य कार्यकर्त्यांनी बायकांना
निवडणुकीच्या रिंगणात आणले .
स्वत: स्वयंघोषित कार्यकर्ता स्वयंम
नेता बनले .
पुर्वीपासुन समाजसेवा , जनसेवा
काम करायला हवी होती .
आज मोठेपणा, दिखाव्याचे हे कार्यक्रम
करण्याची गरज नव्हती .
साड्या वाटपातुन महिलांना प्रलोभने
देवुन पुरे नाही झाले .
युवकांना खेळातुन पैसे वाटप ? की हेच
कार्यक्रम पैसे कमावण्याचे साधन झाले .
निडणुक तोंडावर प्रत्येक गोष्टीची सोशल
मिडीयावर बातमी केली .
गल्लीत मोठेपणासाठी दोन हजारांची दारुसह
बिर्याणी पण वाटली .
मतदार यादीत नाव नसलेल्यांच्या सदिच्छा
भेटीन मतदान मिळणार का ?
तत्काल मध्ये पासपोर्ट मिळतो, तत्काल
कार्यक्रमाने नगरसेवकाचे तिकिट मिळणार का ?
========================