
करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं शिक्षण विभागाला हे पत्रक पाठवले आहे

मुंबई: करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं शिक्षण विभागाला हे पत्रक पाठवले आहे.
करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. करोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबरोबरच विद्यापीठांमधील परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील, असंही पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
करोनाग्रस्ताच्या मृतदेहातून विषाणू पसरतो का?
खबरदारी घ्या! नागपूरमध्ये करोनाचा चौथा रुग्ण
सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी घरातच राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.