वसई : (प्रतिनिधी) : निवडणूक प्रचारात कोणत्याही प्रकारची आमिषे दाखवून मत विकत घेण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षांकडून होऊ नये यासाठी निवडणूक भरारी पथकाची पालघर जिल्ह्यात करडी नजर आहे. निवडणुकीत हमखास पैसे आणि दारू देऊन मतदारांना आकर्षित केले जाते. असे होऊ नये यासाठी निवडणूक भरारी पथकाकडून या सर्वावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. येत्या 29 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मतदान होत असून त्या पार्श्‍वभूमीवर वाहनांच्या तपासण्या करण्याबरोबरच कोठेही आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी भरारी पथके डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. पालघरमध्ये निवडणुकीच्या काळात एखाद्या इसमाकडे 50 हजारांहून अधिक रोकड आढळून आल्यास ती सोबत का बाळगली आहे यासंदर्भातील पुरावे सोबत बाळगले नसतील तर निवडणूक आयोगाकडून कारर्वा करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. अशावेळी रोख रक्कम सोबत बाळगत असाल तर ती का बाळगली आहे त्यासंदर्भातील ठोस पुरावे सोबत बाळगा, अन्यथा नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या पालघर मतदासंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने निवडणूक विभागाच्या भरारी व स्थिर पथकाची निवडणूक घडामोडींवर करडी नजर राहणार आहे. त्यामुळे मतदानाच्या 48 तास आधी 50 हजार रुपयांपेक्षा रोख रक्कम बाळगल्यास पुरावे सोबत ठेवावेत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी केले आहे. आदर्श आचासंहितेच्या कालावधीत मतदानापूर्वीच्या 48 तासांत तपासणी दरम्यान 50 हजारांहून अधिक रक्कम बाळगल्याचे आढळून आल्यास संबंधितांनी ही रक्कम बँकेतून काढल्याचे अथवा कोणत्या कारणासाठी त्याचा वापर होणार आहे, याबाबतचे पुरावे सोबत ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणांसाठी रोख रक्कम बाळगणार्‍या नागरिकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने हे आवाहन करण्यात येत आहे. सबळ पुरावे नसल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *