

महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोरोना या विषाणूचे 32 रुग्ण आतापर्यंत आढळून आलेले आहेत.कोरोना या विषाणूचा आजार श्वसनक्रियेमार्फत, अस्वच्छ हाताद्वारे व पचनसंस्थेमार्फत दुर्मिळ प्रमाणात याचा प्रसार होतो. त्याची लक्षणे सौम्य, मध्यम व तीव्र अशा प्रकारची आहेत.सौम्य लक्षणांध्ये एखाद्या व्यक्तीला हलका ताप, घसा दुखी, खोकला, अंग दुखी, मरगळ येणे ही कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मध्यम लक्षणात जोराचा ताप, खोकताना पिवळा बेडका गिरणे, छातीत दुखणे, दम लागणे असे प्रकार आहेत व तीव्र लक्षणांमध्ये श्वसनक्रिया अपयशी होणे, शरीरभर संक्रमण होणे,इतर अवयव निकामी होणे व अतिशय तीव्र लक्षणांमुळे मृत्यू होणे असे प्रकार आहेत सदरचा कोरोना या विषाणूवर मात करण्यासाठी शासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आव्हान केले आहे.व अनेक उपाययोजना नागरिकांना सांगितले आहेत. तसेच शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सोयीसुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासन करीत आहे.महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणू चे प्रमाण वाढू नये याकरिता प्रशासनाने नागरिकांना मोफत मास्क चे वाटप करणे गरजेचे असल्याने याबाबतचे निवेदन बहुजन महापार्टी तर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना याबाबतचे पत्र देण्यात आलेला आहे.कोरोना या विषाणू पासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात शासनातर्फे सर्व लोकांना फ्री मास्क वाटप करण्यात यावे व नागरिकांना कोरोना विषाणूपासून सावध राह्ण्यासाठी करण्यात येणारे उपाय योजना व नागरिकांनी घ्यावयाची दक्षता याबाबतची माहिती प्रसासनामार्फत नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांनी सांगितले आहे.