

कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी वसई-विरार महानगरपालिका अथक प्रयत्न करत आहे .
मा. आमदार हितेंद्र ठाकुरजी यांच्या मार्गदर्शनात सर्व नायगाव ते विरार रेल्वे स्टेशन , महानगर पालिकेच्या बसेस , इतर सार्वजनिक ठिकाणे व आता सोसायट्याही निर्जंतुक करण्यास आज नायगाव पुर्वला चालु केले .
कोरोनाचे किटाणु खुप पसरत आहे त्यामुळे जगभरात भितीचे सावट पसरलेले आहे ,पण या आजाराचे गांभिर्य लक्षात घेवुन आमदार मा. हितेंद्र ठाकुरजी यांनी वसई-विरार महानगर पालिका अंतर्गत येणारे माॅल , सिनेमा थेटर , शाळा , काॅलेज , आठवडा बाजार , उद्याने सर्व कटाक्क्षाने बंद ठेवण्याचे आदेश दिले , लोकांच्या दैनंदिन गरजेच्या अन्न-धान्य , दुधडेरी , मेडीकल , भाजीपाल्या यांची दुराने गरजेनुसार काही कालावधीसाठी नायपुर्वला चालु असतात .मा. आमदार हितेंद्र ठाकुरजी आपले काम म्हणजे परिपुर्ण निकाल . आपले खुप धन्यवाद !!
आमचे सभापती/ नगरसेवक मा. कन्हैया भोईरजी यांनी स्वत: लक्ष देवुन काही भागात निरिक्षण , पाहाणी केली व सर्व नायगाव पुर्व सुरळीत चालु आहे याची खात्री करुन घेतली व सर्व सोसायट्या निर्जंतुक करण्यासाठी आज पासुन काम चालु करुन दिले .
महानगर पालिकेचे आरोग्य इन्सपेक्टर श्री. विलिन पाटीलजी यांचे विशेष आभार आम्ही मानतो , विलिनजी सतत तत्परसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी खुप खुप धन्यवाद .
आमचे लोकप्रतिनिधी अध्यक्ष श्री. धरेंद्र कुलकर्णीजी कोरोना निर्जंतुक औषध प्रत्येक सोसायटीत पोहचवुन सोसायटी निर्जंतुक झाली का हे स्वत: पाहणी करुन खात्री करन घेत आहेत ,तुमच्या सेवाभवी व जबाबदार नेतृत्वासाठी तुमचे विशेष आभार .
महानगर पालिकेच्या संपुर्ण टिमचे , प्रत्येक कर्मच्याऱ्यांचे आम्ही आभारी आहोत .