


वसई : आज महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 107 वर गेला असून ; मुंबईत पाच तर अहमदनगरमध्ये एक पॉजिटिव्ह रुग्ण मिळाला आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार सज्ज असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपा वसई रोड मंडळाकडून दर दिवशी कोरोनाशी लढणाऱ्या सर्व स्तरातील अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यकरणाऱ्या व्यक्तींना मदत केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपा वसई रोड मंडळाकडून उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वसईतील प्राथमिक आरोग्य केंद्र, नवघर मध्ये “विलीगिकरण कक्ष (ISOLATION WARD)” बनवून देण्यात आला. पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थित हा कक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रास सुपूर्त करण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना सेतीसस्कोप, रक्तदाब तपासण्याचे मशीन, पाच कॅन सॅनिटायजर तसेच विलीगिकरण कक्षासाठी लागणारी सामग्री देण्यात आली. घरोघरी जाणाऱ्या 18 अंगणवाडी सेविकांना यावेळी त्यांच्या स्वरक्षणासाठी किट देण्यात आले.
यावेळी वसई तालुक्याचे प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे, वसई विरार महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले, सहाआयुक्त गिल्सन घोणसालवीस, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर महाले आदी उपस्थित होते. यावेळी खासदार गावित यांनी संपूर्ण आरोग्य केंद्राचा आढावा घेतला व कोणत्याही गोष्टींचा तुटवडा असेल तर मला त्वरित कळवा असे सांगितले.
यावेळी उत्तम कुमार यांनी “विलीगिकरण कक्ष” बनवण्यात मोलाचा वाटा असणारे युडो (YODO) कंपनीचे संचालक विशाल अग्रवाल यांचे आभार मानले. तसेच समजपयोगी कामात प्रत्येक वेळी अग्रेसर असणारी भाजपा इंडस्ट्रीयल सेल व त्याचे पदाधिकारी ज्योतिष नामबीयर, रितेश सत्यनाथ, विनोद कुमार आदींचे आभार मानले. तसेच भाजपा वसई रोड मंडळ पदाधिकारी शेखर धुरी, बाळा सावंत, लालजी कनोजिया, कल्पेश चव्हाण, नागेश शेट्टी आदींना धन्यवाद दिले.