

(वार्ताहार आकेश मोहिते) सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील उद्योगधंदे अर्थात विकासाची सध्यस्थिती ठप्प राहिली असून त्या पार्श्व भूमीवर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद बोलावली असून भारतीयांना आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याची घोषणा त्यांनी केली. १.७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करीत असताना थेट नागरिकांच्या खात्यामध्ये हे पैसे जाणार आहेत असे त्यांनी म्हटले.
* महत्वाच्या बाबी *
१) शेतकऱ्यांचा विचार करिता एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना २००० रुपये देण्यात येणार आहेत.
२) ८० कोटी लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजने नुसार सतत ३ महिने प्रत्येक माणसास ५ किलो गहू किंवा तांदूळ देण्याचे ठरवले आहे.
३) डॉक्टर आणि आरोग्य सेवेसाठी प्रत्येक व्यक्तीला ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
४) उज्वला योजने अंतर्गत ८.३ कोटी बी.पी.एल कुटुंबियांना पुढील ३ महिने ३ सिलेंडर देण्याचे ठरविले आहे.
५) जनधन योजने अंतर्गत २० कोटी महिला खातेदारांना महिना ५०० रुपये देण्यात येण्याचेही ठरविले आहे.
कोरोनामुळे आर्थिक दृष्ट्या भारतीयांना अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास येता त्या पार्श्व भूमीवर आर.बी.आय ला केंद्राचे बॉंड खरेदी करण्यास सांगितले असून ७.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज सरकार कडून घेतले जाईल. याची दाट श्यक्यता पडसावत आहे. तरी सामान्य जनतेला आर्थिक दृष्ट्या त्रास न होता प्रत्येकाच्या हिताच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आलेले आहेत असा उद्देश असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.