(प्रतिनिधी स्नेहा जावळे) आज सर्वत्र कोरोना आजीराची भिती असतानाही काही समाजसेवक आपले माणुसकीचे कार्य चालुच ठेवुन आहेत . इच्छा तेथे मार्ग हे खरच आहे . नालासोपारा रेहमत नगर के रहिवासी आणि समाजसेवक गरजु व हातावरच पोट असणाऱ्या व्यक्तींसाठी मनोभावे जेवण पुरवण्याचे कार्य चालु केले आहे . लॉक डाउन मध्ये लोकांना बाहेर पडता येत नाही आहे त्यामुळे त्याना जीवनावश्यक वस्तू अन्न धान्य औषधे गरजू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे या अनुषंगाने
नालासोपारा रेहमतनगर वाॅर्ड क्र 49 इथले समाजसेवक श्री. फारुख मिस्त्रीजी(नालासोपाराअध्यक्ष ह्यूमन राईट्स फौंडेशन) , युवाशक्ती फाऊंडेशन चे वसई तालुका अध्यक्ष आणि युवाशक्ती एक्सप्रेस चे पत्रकार एस रेहमानजी(जाजी) , युवाशक्ति एक्सप्रेस पत्रकार एस रहमान क्राइम चेक लाइव पत्रकार शीतल चौहान. भारत न्यूज़ 24 पत्रकार क़ासिम खान  सामाजिक कार्यकर्ता अफजल मंसुरी , फिरोज शेख ,अशरफ खान आदी रहमत नगर रहिवासी संघचे या सर्वांनी मिळुन गरजु लोकांसाठी जेवण स्वत: बनवुन वाटप केले .
या गरजु लोकांसाठी आजपासुन रोज हे कोरोना संकट संपेपर्यंत ही जेवणाची सोय उपलब्ध असणार आहे , कारण यातल्या काही लोकांना राहायला घर नाही त्यामुळे अन्न शिजवायचे साधन ही नाही ,हे लक्षात घेवुन या सर्व समाजसेवकांनी ही जबाबदारी स्विकारली आहे .
यापुढे जावुन या टिम नी लवकरच लहान झोपड्यात, रोडबाजुला घर करुन रोजचे हातावर पोट असणाऱ्याना मुलभुत गरजेचा शिदा पण लवकरच वाटप करणार आहे . या सर्व समाजसेवकांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *